
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात स्मार्टफोन घेणाऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी स्मार्टफोन पार्ट्सच्या आयातीवर सूट दिली आहे. स्मार्टफोनचे कंपोनंन्टस, चार्जर यांच्या आयात शुल्कात कपात करण्याचीही घोषणा केली आहे.

स्मार्टफोन कंपन्यांना परदेशातून स्मार्टफोनच्या निर्मितीमध्ये वापरले जाणारे पार्ट्स आयात करण्यावर कमी कर भरावा लागेल. भारतात 5G स्मार्टफोनची खूप मागणी आहे. 5G स्मार्टफोनच्या निर्मितीमध्ये वापरले जाणारे चिपसेट आणि इतर घटक विदेशातून आयात करावे लागतात. अशा परिस्थितीत स्मार्टफोन बनवण्याचा खर्च कमी असेल. यामुळे आगामी काळात स्मार्टफोनची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार यावर्षी 5G स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली आहे.