पुणे शहर

कोथरुडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम घेऊन साजरी…

कोथरुड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवशाही प्रतिष्ठान – महाराष्ट्र राज्यच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व दंत तपासणी शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. कोथरुडमधील आझादनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी शिवशाही प्रतिष्ठानचे राज गोविंद जाधव, हिमांशू इंगोले, तेजस राऊत, अनिकेत मांडके, विश्वनाथ मोहोळ, आकाश शेट्टी, सदाशिव आलट, हिमांशू देठे, अमेय मेश्राम, आनंद पाटील, मिथिल नगरे, सार्थक मोकाटे, ओमकार पाटील, स्वराज घोडेकर, कुणाल कासारे, कैलास ससते, कार्तीक मोटकुले, अभिषेक पाटील, प्रथमेश ढोकरे, ह्रतविक जिद्देवार, निहाल टोनपे, आमन डोंगरे उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवशाही प्रतिष्ठानने सामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेऊन सामाजिक उपक्रम घेऊन साजरी केल्याने प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये