पुणे शहर

चंद्रकांत पाटील यांच्याकडून उपायुक्त संदीप कदम यांची झाडाझडती

सूस घनकचरा प्रकल्प आजच बंद करा, अन्यथा….

पुणे : उच्च तंत्र शिक्षण मंत्री व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे आज पुन्हा सूस घनकचरा प्रकल्पावरुन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांची झाडाझडती घेत, आजच प्रकल्प बंद न झाल्यास, उद्या सदर प्रकल्पाविरोधात खूर्ची टाकून बसण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा दिला.

सूस रस्त्यावरील ओल्या कचऱ्यापासून सीएनजी तयार करण्याचा प्रकल्प बंद करण्याची सातत्याने मागणी होत आहे. सदर प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करुन नांदे-चांदे येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय जानेवारी २०२४ मध्ये झाला होता. त्याअनुषंगाने चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्या सोबत आज बैठक झाली. या बैठकीत पाटील यांनी सदर प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

Screenshot 20250327 192122 samsungnotes6439383861966424262

या बैठकीत अद्याप सदर प्रकल्प स्थलांतरित का झाला नाही? असा प्रश्न पाटील यांनी उपायुक्त संदीप कदम यांना विचारला. त्यावर कदम यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे महापालिकेकडून कोणतीच कारवाई झालेली नसल्याने,  चंद्रकांत पाटील यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.

तसेच, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधून महापालिकेच्या भोंगळ काराभाराप्रति निषेध व्यक्त केला. त्याशिवाय महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांना सदर प्रकल्प आजच बंद झाला नाही; तर उद्या प्रकल्पाविरोधात बसण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा दिला.

Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये