महाराष्ट्र
चिपळूण पुणे विश्रांतवाडी आळंदी बससेवा सुरू

चिपळूण : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांच्या सेवेसाठी चिपळूण आगारातून ५ डिसेंबरपासून चिपळूण-स्वारगेट -पुणे-विश्रांतवाडी -आळंदी ही साधी बससेवा सुरू करण्यात आली आहे. चिपळूण आगार येथून चिपळूण-पुणे-आळंदी ही बस सकाळी ७.४५ वाजता सुटणार असून पाटण-सातारा हायवे-स्वारगेट -स्टेशन-येरवडा -विश्रांतवाडी -दिघी-ऍमेझॉन चौक मार्गे असणार आहे.
रात्री ८ वाजता ही बस आळंदी-दिघी-विश्रांतवाडी-पुणे स्टेशन-स्वारगेट-सातारा -पाटण-चिपळूण (व्हाया चिपळूण रेल्वे स्टेशन) मुसाड मार्गे चोरवणे निवे अशी येणार आहे. या बसचे ऑनलाइन रिझर्वेशन (संगणकीय आगावू आरक्षण) सुरू करण्यात आले आहे. तरी या बससेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक अजित राजेशिर्के यांनी केले आहे.




