कर्वेनगरमध्ये डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त ; शिवसेना महिला आघाडीची मागणी नंतर उपाययोजना सुरू..

कर्वेनगर : कर्वेनगर व वारजे भागांमध्ये गेले अनेक दिवसांपासून डासाचा फैलाव वाढत असुन
त्यामुळे कर्वेनगर भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कर्वेनगर वारजे परिसराला लागून असलेल्या मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर असणारी जलपर्णी याला कारणीभूत असून या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आल्यानंतर धूर फवारणीला महापालिका प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे.
कर्वेनगर, वारजे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख वैशाली दिघे यांच्या वतीने निवेदनाद्वारे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांच्याकडे करण्यात आली होती. यावेळी दिपाली रावडे, अंजली पाटील, अरुणा नाईक, रसिका पंडित,संगीता दिघे, लता शिंदे, मनिषा पायगुडे तसेच कोथरुड विधानसभा समन्वयक जगदीश दिघे, सचिन पाटोळे, कुणाल दिघे आदी उपस्थित होते.

कर्वेनगर वारजेचा परिसरातील एकता कॉलनी, तपोधाम परिसर, सद्गुरू कृपा कॉलनी, ब्रम्हचैतन्य, दुधानेनगर वारजे नाका परिसर, शाहु कॉलनी १ ते १०, थोरात कॉलनी, वेदांत नगरी, कुलश्री कॉलनी, श्रीमान सोसायटी, ज्ञानदिप कॉलनी, कर्वेनगर गावठाण, श्रमिक वसाहत, असा परिसर मुठा नदी जवळ आहे. नदीमध्ये जलपर्णी खुप साठल्याने डासांचा फैलाव वरील परिसरात खुपचं वाढला आहे, त्यामुळे जलपर्णी काढून परिसरामध्ये किटकनाशक फवारणी धुर फवारणी करण्याची मागणी दिघे यांच्याकडून करण्यात आली होती. या मागणीची महापालिका प्रशासनाकडून दाखल घेण्यात आली असून धूर फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.



