व्हायरल व्हिडिओ

BABA RAMDEV ON PETROL : पेट्रोल 30 ते 40 रूपये लीटरच्या प्रश्नावर भडकले बाबा रामदेव

नवी दिल्ली : योग गुरु बाबा रामदेव (Yog Guru Ramdev) एका पत्रकार परिषदेत त्यांना पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीविषयी प्रश्नावर चांगलेच भडकले. करनाल शहरातील पत्रकारांच्या एका अडचणीच्या प्रश्नास उत्तर देताना ते संतापले.

करनाल शहरातील बांसो गेट येथील एसबी मिशन शाळेच्या अभेद शक्ती सदन शाळेत त्यांचे मित्र महाराज अभेदानंद यांना भेटण्यासाठी ते आले होते. शाळा व्यवस्थापनाने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. कॉंग्रेसचे सरकार असताना बाबा रामदेव यांनी दावा केला होता की, सरकारने परवानगी दिल्यास ते 30 ते 40 रुपये लीटरने पेट्रोल विकू शकतात. नागरिकांना कोणते सरकार हवे आहे. ते कोणाला मत देणार 40 रुपयांनी पेट्रोल देणार्यांना की 80 रुपयांनी पेट्रोल देणार्यांना? याबाबत प्रश्न विचारल्यावर ते भडकले आणि म्हणाले,”तेरे प्रश्न बहुत हो गए तू अब चुप हो जा और हां मैंने ऐसा था अब क्या पूंछ पाड़ेगा मेरी? त्यानंतर ते म्हणाले,“चुप हो जा, अब आगे से पूछेगा तो ठीक नहीं। तू कोई ठेकेदार है, जो मैं तेरे हर सवाल का जवाब दूं, जब एकबार कह दी तो थोड़ा सभ्य भी बन जाया करो।” 

बाबा रामदेव म्हणाले, हां मैंने वो बयान टीवी पर दिया था और अब नहीं देता बता क्या करेगा। तुम अच्छे माता-पिता की औलाद हो, ऐसे सवाल मत पूछो। महागाईच्या प्रश्नावर त्यांनी नागरिकांनी अधिक मेहनत करावी, असा सल्ला दिला. या घटनेनंतर आता सोशल मीडियावर #BoycottPatanjali ट्रेंड होऊ लागले आहे.

https://twitter.com/8PMnoCM/status/1509171565723717634
https://twitter.com/HansrajMeena/status/1509198696751439872
Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये