पुणे शहर

कर्वेनगर येथील बंद केलेले सार्वजनिक शौचालय तातडीने सुरू करावे : आम आदमी पक्षाचे आंदोलन

पुणे: महापालिकेने विकास चौक कर्वेनगर येथे बंद केलेले सार्वजनिक शौचालय तातडीने सुरू करावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीने आज सोमवारी आंदोलन केले.

कर्वेनगर परिसरामध्ये असलेल्या भाजी मंडई, दुकानदार, हॉटेल येथील विक्रेते, ग्राहक तसेच नागरिकांसाठी महिलांसाठी विकास चौक कर्वेनगर येथे असलेले सुस्थितीतील सार्वजनिक शौचालय हे सोयीचे असून देखील गेल्या काही महिन्यांपासून या सार्वजनिक शौचालयाला टाळे लावण्यात आले आहे. हे शौचालय सुरू करावे यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने सहाय्यक आयुक्तांकडे विचारणा केली असता सार्वजनिक शौचालय महिला व बालकल्याण समिती ठराव क्रमांक 40 (दिनांक ९/९/२०२०) अनुसार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे पत्र महानगरपालिकेने आम आदमी पक्षाला दिले आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

स्थानिक नगरसेवक आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी दिशाभूल करून हेतूपुरस्सर हे सार्वजनिक शौचालय पाडण्याचा आणि ही जागा हडपण्याचा डाव आखला आहे. पुणे शहरामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सार्वजनिक शौचालय आणि मुताऱ्यांची संख्या अपुरी असून त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची गरज असताना चालू स्थितीतील सार्वजनिक शौचालय बंद करून पाडण्याचा घाट घातला असल्याचा आरोप करित याविरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने स्थानिक नागरिकांनी मध्ये सह्यांची मोहीम सुरु केली आहे.

या आंदोलनामध्ये डॉ अभिजीत मोरे, प्रा सुहास पवार , सुशील बोबडे , सुजित अगरवाल , रोहन रोकडे, घनश्याम मारणे, विक्रम गायकवाड , किशोर मुजुमदार, ऋषिकेश मारणे, यश खेतान, किर्तीसिंग चौधरी, अविनाश सावंत, दत्तात्रय भांगे व इतर कार्यकर्ते सामील झाले होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये