पुणे शहरमहाराष्ट्र
पुण्यासह राज्यात थंडीचा कडाका वाढतोय ; पुण्याचा पारा ११.२ अंशावर

पुणे : मागील आठवडाभरापासून राज्यात गुलाबी थंडी पडली आहे. त्यात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. 21 फेब्रुवारीपर्यंत राज्यातल्या अनेक पुण्यासह शहरांचं तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात आधीच घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांचं तापमान तर 8 ते 9 अंशांपर्यंत खाली आलं आहे. त्यामुळे नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. तर ऊबदार कपडेही कपाटाबाहेर काढून वापरात आलेत.




