कोथरुडमध्ये ई व प्लास्टिक वेस्ट संकलन महाअभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

कोथरुड : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षे संपूर्ण देशभर आपण साजरा करत आहोत. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२२ ” अन्वये विशेष महाअभियान अंतर्गत कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ई व प्लास्टिक वेस्ट संकलन महाअभियानाला अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. या अभियानात एकूण २७८७ किलो ई – वेस्ट, ९५८ कि. प्लास्टिक वेस्ट तसेच ३८० कि. थर्माकोल व इतर टाकाऊ वस्तू जमा झाल्या.
पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग, कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी व जनवाणी, सागर मित्र, थंब क्रिएटिव्ह, आदर पूनावाला क्लिन सिटी इनिशिएटीव्ही, के. के. नाग आणि इतर शैक्षणिक व सामाजिक इत्यादी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक १०, ११, १२ या तीनही प्रभागात ” हे ई- वेस्ट व प्लास्टिक वेस्ट महाअभियान राबविण्यात आले.

प्रभाग क्रमांक १२ मयूर कॉलनी आरोग्य कोठीवर लाल फीत कापून महा अभियानास सुरुवात करण्यात आली. नागरिकांनी बेस्ट प्लास्टिक वेस्ट कचऱ्यामध्ये न टाकता महा अभियानामध्ये नेमून दिलेल्या संकलन केंद्रावर आणून देऊन पुणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण मध्ये नंबर एक आणण्यासाठी नागरिकांनी व स्वयंसेवी संस्थांनी सहभागी व्हावे व आपला भारत देश व आपले पुणे शहर स्वच्छ करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त कुणाल खेमनार यांनी यावेळी केले.
सदर कार्यक्रम आयोजित करण्यात महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी कमिन्स इंडियाचे संदीप क्षीरसागर, अनिल कुलकर्णी, दीपक बेती, संपत खैरे, रमेश डुंबरे, चंद्रशेखर अरुणके, सदाशिव एकसंबे, संजय गोळे, सोमनाथ वाले, जनवाणी चे समीर अजगेकर, जयश्री पाटील, नीता नाईक, मंगेश क्षीरसागर, जगन्नाथ ढगे, पल्लवी दंभ, विनायक बोधनकर आणि पी. व्ही. पी. आय.टी. कॉलेज बावधन आणि सूर्यदत्ता कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले होते.



कोथरुड मधील एकूण २० संकलन केंद्रावर हे अभियान राबवण्यात आले. या संकलन केंद्रांवर आकर्षक रांगोळी काढण्यात आली तसेच आकर्षक फूल झाडाच्या कुंड्या ठेवून सजवण्यात आले होते. सदर केंद्रावर येणार्या नागरिकांचे गुलाब पुष्प देऊन विशेष स्वागत मोकदम वैजीनाथ गायकवाड यांनी केले.
सदर महाअभियानात २० संकलन केंद्रावर ५३० किलो जुने कपडे, ११५ जोड चपला, ८७ जोड बूट, २७ टि.व्ही. १५ संगणक, ८ लॅपटॉप, १३ सांऊन्ड सिस्टीम, १५ घड्याळे, २५ मोबाईल तसेच चार्जर, वायर, सेल, बॅटऱ्या, रेडिओ असे एकूण २७८७ किलो ई – वेस्ट व ९५८ कि. प्लास्टिक वेस्ट तसेच ३८० कि. थर्माकोल व इतर टाकाऊ वस्तू जमा झाल्या.
आभियानात तीनही प्रभागात एकूण ३८७ नागरिकांनी आपल्या कडील जुन्या व टाकाऊ वस्तू उत्स्फूर्तपणे आणून देऊन सहभाग नोंदवला.सदर अभियान महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आरोग्ष ताटकर, शिवाजी गायकवाड, नवनाथ मोकाशी, रूपाली शेडगे, हनुमंत चाकणकर, गणेश चोंधे, गणेश साठे, सतीश बनसोडे ईत्यादी सर्व आरोग्य निरिक्षक व मोकादम यांनी आप आपल्या संकलन केंद्रावर ई – वेस्ट व प्लास्टिक वेस्ट महा अभियान राबवण्यास परिश्रम घेतले.य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, प्रमोद चव्हाण, वैभव घटकांबळे, संतोष ताटकर, शिवाजी गायकवाड, नवनाथ मोकाशी, रूपाली शेडगे, हनुमंत चाकणकर, गणेश चोंधे, गणेश साठे, सतीश बनसोडे ईत्यादी सर्व आरोग्य निरिक्षक व मोकादम यांनी आप आपल्या संकलन केंद्रावर ई – वेस्ट व प्लास्टिक वेस्ट महा अभियान राबवण्यास परिश्रम घेतले.



