पुणे शहर

पुण्यात ढग फुटी सदृश्य पाऊस; रात्री 81 मिलिमीटर पावसाची नोंद, रस्त्यांना नदीचे स्वरूप

आज आणि उद्या देखील जोरदार पाऊसाची शक्यता

पुणे: पुण्यात परतीच्या पावसाने मध्यरात्री अक्षरश: हैदास घातला होता. सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. ठिकठिकाणी पावसामुळे पाणी साचले होते. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत 81 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुण्यात आज आणि उद्याही गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुण्यात रात्री विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या एकूण 12 जणांची सुखरुप सुटका केली.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

https://fb.watch/gdVfi7MEJo/

Fb img 1647413711531

राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आणि या परतीच्या पावसाचा फटका पुणे शहरालादेखील बसला. सोमवारी रात्री कोथरूड, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. बिबवेवाडी परिसरात तर ढगफुटी सारखा पाऊस झाला. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं.

पावसाच्या धुमाकुळामुळे जनजीवन विस्कळीत झालं आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. कोंढवा खुर्द भाजी मंडई, मंगळवार पेठ आणि सदाआनंदनगरमधून साचलेल्या पाण्यातून 12 जणांची सुटका करण्यात आली.

Img 20221012 192956 045

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये