पुणे शहर

शिवाजीनगर एसटी बस स्थानकाची उभारणी लवकरच सुरू होणार-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे: ‘‘शिवाजीनगर एसटी बसस्थानक उभारणीसाठी महा मेट्रो आणि एसटी महामंडळ यांच्यातील करार अंतिम टप्प्यात आला असून येत्या तीन वर्षात बस स्थानकासह तेथे भव्य संकुल उभारण्यात येणार आहे.” असे आमदार शिरोळे यांनी सोमवारी सांगितले.

यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून गेल्या वर्षी त्यांनी या प्रयत्नाला वाचा फोडली. त्यानंतर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांशी अनेक बैठका घेत या समस्येतून मार्ग काढला महामेट्रो चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांची सोमवारी भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. 

Screenshot 2024 08 20 16 33 27 551301213897430355510

शिरोळे म्हणाले ” देवेंद्र फडणवीस  मुख्यमंत्री असतांना  याबाबतचा आराखडा तयार केला होता. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अडीच वर्षाच्या काळात त्या संदर्भात काहीही हालचाली  झाल्या नाहीत. महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मी याबाबत पाठपुरावा केला. एसटी महामंडळाने त्यांचा आराखडा महा मेट्रोकडे दिला आहे. पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून महा मेट्रोने त्याच्या कराराचा मसुदा बनविला आहे.

येत्या पंधरवड्यात याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल.
सर्वसाधारणपणे हा प्रकल्प सुमारे 250 ते 300 कोटी रुपयांचा असल्याची माहिती शिरोळे यांनी दिली. ते म्हणाले शिवाजीनगर मेट्रोचे भुयारी स्थानक सुरू झाले आहे. मेट्रो रेल्वे आणि एसटी बस गाड्या एका ठिकाणी उपलब्ध झाल्याने पुणेकरांची मोठी सोय होणार आहे येत्या वर्षभरात हिंजवडी ते न्यायालय हा मेट्रो मार्गही लवकर सुरु होईल.

Fb img 16474137314571819310932637888379
Img 20240404 wa00123413096165072096535
Img 20240404 wa00134916733315783821383

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये