महाराष्ट्र

अपुऱ्या नियोजनामुळे कोरोना नियंत्रणाबाहेर – चंद्रकांत पाटील

सांगली : राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे आणि अपुऱ्या नियोजनामुळे राज्यात कोरोना नियंत्रणात येण्याचे नाव घेत नाही.सांगली जिल्ह्यात देखील परिस्थिती गंभीर आहे.  असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या इतर पदाधिकाऱ्यांसह मिरज येथील सरकारी मेडिकल कॉलेज मध्ये बैठक घेतली. या बैठकीत येथील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली.

पाटील म्हणाले, या बैठकीत राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले. कोव्हीड-१९ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यासोबतच मृत्यूदराच्या प्रमाणात देखील वाढ होत चालली आहे. त्यामुळे चाचण्या वाढवण्याची अत्यंत गरज आहे, असे मला वाटते. ऑक्सिजनयुक्त बेड्स आणि व्हेंटिलेटर्सची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे या गोष्टींची व्यवस्थादेखील वाढवावी लागणार आहे. राज्य सरकारने यामध्ये अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यासोबत बेड मॅनेजमेंटमध्ये सुधारणा करायला हव्यात.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना मिळत नाहीये. राज्य सरकारने सुरुवातीपासूनच या महामारीकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही. नागरिकांना योग्यप्रकारे आधार दिला गेला नाही. परिणामी राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि मृत्युदर वाढत चालले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली पाहिजे, असे ही पाटील म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये