पुणे शहर

पाषाण – सुसरोड परीसरात कोविड-19 लसीकरण केंद्र सुरु शिवम सुतार यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : स्वीकृत नगरसेवक शिवम आबासाहेब सुतार यांच्या पाठपुराव्याला यश पाषाण सुसरोड परिसरातील नागरिकांसाठी आदिशक्ति योग भवन येथे मोफत कोविड-19 लसीकरण केंद्राचे पुण्याचे महापौर  मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी पाषाण कुटी रुग्णालय येथे लसीकरन केंद्र सुर झाले. परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. त्या मुळे प्रभाग समिती स्वीकृत नगरसेवक शिवम् आबासाहेब सुतार यानी महापौरांची भेट घेऊन त्याना ही परिस्थिति सांगितली आणि महापौरानी लवकरात लवकर सुतारवाड़ी मधे नविन लसीकरण केंद्र सुरु करण्याचे आदेश दिले.

Img 20210223 wa0156

तसेच काय खबरदारी घ्यावी याची महापौर यांनी  माहिती दिली व् तेथील नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी आबासाहेब सुतार,सुरेश कोकाटे, अंबादास कोकाटे, उत्तम जाधव रोहन कोकाटे, आकाश पवार, प्रज्वल कोकाटे, प्रदीप नाथ,प्रसाद सुतार, विशाल लांगी,राहुल बहिरमे  सहाय्यक आयुक्त  जयदीप पवार, डाॅ.गणेश डमाले,केंद्रप्रमुख डाॅ.पल्लवी खिरडकर , निखिल निकम उपस्थित होते. सुस रोड, सुतारवाडी, शिवनगर आदी परिसरातील नागरिकांना यामुळे लसीकरण करणे सोयीस्कर होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये