कोथरूड, कर्वेनगरमध्ये देखावे पाहण्यासाठी भर पावसातही नागरिकांची गर्दी

कोथरूड : कोथरूड, कर्वेनगर भागातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने यंदाच्या वर्षी वैज्ञानिक, पौराणिक, ऐतिहासिक या विषयावर आधारित देखावे सादर केले आहेत. यासोबतच काही मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
संगम तरुण मंडळ शास्त्रीनगर – अफजल खानाचा वध जिवंत देखावा
शास्त्रीनगर येथील संगम तरुण मंडळ यांच्यावतीने अफजल खानाचा वध या ऐतिहासिक विषयावर आधारित जिवंत देखावा सादर केला आहे. माजी नगरसेवक किशोर शिंदे हे मंडळाचे अध्यक्ष असून संजय काळे मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत.

नवभारत मित्र मंडळ भेलके नगर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह मागे,
हे मंडळ दर वर्षी वैज्ञानिक देखावा सादर करीत आहे.ज्यामधून मुलांना सविस्तर माहिती मिळून हलत्या देखाव्या मुळे मुलांना त्याची उत्तम माहिती मिळू शकेल हाच मंडळाचा त्या मागील हेतू आणि ह्याच कारणा मुळे श्रोत्यांचा मंडळाचा देखावा पाहण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आणि दरवर्षी श्रोते आपणहून देखावा पाहण्या साठी सह परिवार आवर्जून येतात. सन २०१९ साली मंडळाने सादर केलेल्या चंद्रयान -२ देखाव्याची दखल श्रोत्यां सोबतच पुण्य नगरीतील नवसाला पावणारा गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टनेही घेतली आणि ह्यासाठी नवभारत मित्र मंडळाला पश्चिमी विभागात वैज्ञानिक देखावा सादरीकरण साठी प्रथम पारितोषिक जाहीर केले. ह्या वर्षी मंडळाने सूर्यमाला हा देखावा सादर केलेला असून त्यामध्ये सर्व ग्रहांची माहिती सुद्धा दिलेली आहे.



श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळ कर्वेनगर संचालित श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर देवस्थान कोटेश्वर महादेव हा देखावा साकारला आहे. रुद्रप्रयाग शहरापासून ०३ किमी अंतरावर कोटेश्वर महादेव हे एक प्राचीन मंदिर आहे. कोटेश्वर महादेव मंदिर हे शिवाला समर्पित आहे. चारधामच्या यात्रेला जाणारे बहुतेक भाविक हे मंदिर पाहूनच पुढे जातात, गुहेच्या रूपात असलेले हे मंदिर अलकनंदा नदीच्या काठावर वसलेले आहे. मान्यतेनुसार,
केदारनाथला जाताना भगवान शिवाने या गुहेत ध्यान केले
होते आणि येथे शिवाचे स्वयंभू लिंग आहे…!!



सिद्धार्थ मित्र मंडळ (ट्रस्ट)
गुजरात कॉलनी कोथरूड पुणे ३८.
—रौद्रशंभो अवतार—
मंडळाने ह्या वर्षी नवीन गणेशाची मूर्ती बनवली आणि अखंड महाराष्ट्राचे आपले आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज ह्यांचा अवतार गणपती बाप्पा मध्ये उतरवण्याचा छोटासा प्रयत्न मंडळाने केला.संघटक- अमोल गायकवाड,अध्यक्ष- कमलेश फाले,उपाध्यक्ष- आरव दिघे,सेक्रेटरी- मंगेश भोंडवे, खजिनदार- तेजस बनकर



‘वनाझ इंजिनिअर्स लि. कंपनीचा सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव’
कोथरूड येथील बनाझ इंजिनिअर्स लि. कंपनीतील गणेशोत्सवाचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.
त्यानिमित्ताने ‘साईबाबांची व्दारकामाई’ हा सुंदर व आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. साई बाबांचे वास्तव्य असलेल्या शिर्डी येथील व्दारकामाई मधील साईबाबांनी वापरलेल्या वस्तूंची हुबेहुब व आकर्षक मांडणी केली आहे, त्यामुळे हा देखावा पाहणा-यांचे लक्ष वेधून घेत आहे.
गणेशाची प्रतिष्ठापना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मिलिंद खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे कामगारांच्या गुणवत मुला-मुलींना शैक्षणिक व विशेष क्षेत्रातील कार्यासाठी पुरस्काराने गौरवण्यात आले. गणेशोत्सवातील सर्व व्यवस्थापन बनाझ इंजिनिअर्स एम्प्लॉईज युनियन यांनी केले आहे. संघटनेचे अध्यक्ष वाय. के. कदम, उपाध्यक्ष विजय डेरे, जनरल सेक्रेटरी तुषार चौधरी, सह- सेक्रेटरी महेश धावडे, खजिनदार राजेश पवार, सह-खजिनदार अमित केसवड, संघटक हनुमंत धुमाळ यांनी सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.






