कोथरुड

शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने कोथरूड पोलिसांना चीक्कीचे वाटप..

कोथरुड – शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही कोथरुड पोलिस स्टेशन मधील सर्व अधिकारी व महिला पोलिसांना राजाभाऊ गोरडे यांच्या हस्ते चिक्कीचे वाटप करण्यात आले.

यावेळी गोरडे म्हणाले की गणेशोत्सव काळात पोलिसांवरती बंदोबस्ताचा प्रचंड ताण असतो.त्यांना जेवणासाठी सुध्दा वेळ मिळत नाही.भुकेच्या वेळेला शेंगदाणे चिक्की पटकन खाता येते. चिक्की खालल्याने शरीराला ऊर्जा मिळते.ताण तणाव पासून मुक्तता मिळते.

यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप , क्राइम पोलिस निरीक्षक बाळासाहेब बढे व मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे संयोजन राजाभाऊ गोरडे यांनी केले होते .

Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये