पुणे शहर

डॉ.प्रभावती शंकर तोडकर मिनी मार्केटचे लोकार्पण

पुणे – महापालिकेने दारुवाला पुलाजवळ उभारलेल्या कै.डॉ.प्रभावती शंकर तोडकर मिनी मार्केटचे लोकार्पण माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

या लोकार्पण सोहळ्याला माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार कमल ढोले पाटील तसेच सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी, रविंद्र धंगेकर, वनराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, विशाल धनवडे, अनिल सोंडकर, राजश्री यशोधन वनगे, माजी उपमहापौर डॉ.शंकरराव तोडकर, डॉ.जयश्री शंकरराव तोडकर आदी प्रमुख नागरिक उपस्थित होते.

डॉ.प्रभावती तोडकर आणि माजी उपमहापौर डॉ.शंकरराव तोडकर या दाम्पत्याने कसबा पेठ, मंगळवार पेठ आणि मध्य वस्तीतील परिसरात सर्व थरातील लोकांसाठी अनेक वर्षे वैद्यकीय सेवा केली. डॉ.प्रभावती तोडकर यांनी वैद्यकीय व्यवसायाबरोबरच अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध राखले. डॉ.शंकरराव तोडकर नगरसेवक असताना प्रभावतीताईंनी त्यांना मोलाची साथ दिली आणि अनेक सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडल्या. महापालिकेने आपल्या मिनी मार्केटला डॉ.प्रभावती तोडकर यांचे नाव देऊन त्यांचा यथोचित सन्मान राखला आहे, असे वक्त्यांनी मिनी मार्केट लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलताना सांगितले.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये