राष्ट्रीय
दिल्लीत झोपडपट्टीला भीषण आग; सात जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील गोकलपुरी येथे लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. आग आटोक्यात आणण्यात आली आहे, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून सात मृतदेह बाहेर काढले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 13 गाड्या, सर्व बचाव उपकरणांसह तात्काळ पथके घटनास्थळी दाखल झाली. आगीत 60 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.




