महाराष्ट्र

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास व शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विनम्र अभिवादन..

पुणे :- “महाराष्ट्र शूरांची भूमी असून राज्याला शौर्य, त्याग, पराक्रम, बलिदानाची गौरवशाली परंपरा आहे. स्वत्व, स्वाभिमानासाठी आत्मबलिदान करणाऱ्या वीरांचा हा महाराष्ट्र आहे. कोरेगाव भीमाचा इतिहासही महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे. कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईत लढलेल्या, शहीद झालेल्या वीरांना मी विनम्र अभिवादन करतो.

कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईतील  वीरांना वंदन करण्यासाठी येणाऱ्या बंधू-भगिनींबद्दल आदर व्यक्त करून जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बांधवांनी कोरोना प्रतिबंधक नियम तसेच आदर्श कोरोना आचारसंहितेचे पालन करावं, शक्यतो आपापल्या घरूनच जयस्तंभास अभिवादन आणि शहीद वीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये