वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू ;

नवी दिल्ली : वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब येथील भाविकांचा समावेश आहे. सर्व जखमींवर या सर्वांवर कटरा आणि ककरायल नारायण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.14 ते 20 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचात आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातानंतर वैष्णोदेवीची यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून २ तर जम्मू-काश्मीर सरकार कडून १० लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.
बचावकार्य सुरू आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांप्रती शोक व्यक्त केला आहे तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे.




