आरोग्य

मधूमेह आणि हाडांचे आजार.. काय घ्यावी काळजी

डॉ.सचिन‌ नागापूरकर
अस्थिरोग व कृत्रिम सांधावरोपण शस्त्रक्रिया तज्ञ पुणे

आज जगभरातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात साधारणपणे ४० ते ४५ कोटी लोकसंख्या मधूमेहाच्या आजारावर उपचार घेत आहेत, आणि साधारणपणे १ ते दिडकोटी लोक मधूमेहाच्या आजारामुळे दरवर्षी मृत्यूमुखी पडतात. भारत देश तर आज जगभरात मधूमेहाची जागतिक राजधानी बनली आहे. साधारणपणे कुटुंबातील एक सदस्य तर मधूमेहाच्या आजारावर उपचार घेत आहेत.

मधुमेहाचे लवकर निदान, लवकर उपचार आणि पथ्य ह्या त्रिसुस्त्रीच्या आधारावरच मधूमेहाच्या आजारावर नियंत्रण ठेवणे सोपे आहे. अनियंत्रित मधुमेहामुळे शरिरावर असंख्य परिणाम दिसून येतात. डोळ्यांचे आजार, किडणीचे आजार, यकृताचे, स्वादूपिंडाचे आजार, स्मृतीभ्रंश तसेच हाडांच्या बाबतीत बरेच आजार अनियंत्रित मधुमेहामुळे शरिरावर होतात.

Img 20231111 wa0004281292791598778819580777

हाडांच्या आजाराचा विचार केला तर प्रामुख्याने….

हाडे ठिसूळ होणे, हाडांची घनता कमी होणे, परिणामी हाडं तुटणे, स्नायू कमकुवत होणे, सतत पाठ कंबर मान गुडघेदुखी होणे ही लक्षणे दिसू लागतात.

सतत पाठ कंबर मान दुखीमुळे मनक्यातील नसा फुगून नसा कमकुवत होणे नसांची ताकद कमी होणे, नसांची दाह होणे
असे आजार लक्षणं अनियंत्रित अथवा जास्त कालावधीसाठी असलेल्या मधूमेहाच्या आजारावर मुळे दिसून येतात.

अनियंत्रित मधुमेहामुळे शरिरातील अंत्यंत महत्वाचे व्हिटॅमिन डी आणि बी.१२ चे प्रमाण दिवसेंदिवस कमी होते. परिणामी स्नायूंची ताकद कमी होते. नसां कमजोर होतात. हात पायांना मुंग्या येणे, हात पायाची ताकद कमी होणे, सतत वेदना होत राहणे. हाताचा पंजा पायाचा तळवा यांना मुंग्या येणे अशी लक्षणे दिसू लागतात.

Img 20230717 wa0012281292712276676815194924

अनियंत्रित मधुमेहामुळे अथवा बरेच कालावधीसाठी मधूमेहाच्या आजारामुळे खांद्याच्या हालचाली मंदावतात ज्याला वैद्यकीय विषयात फ्रोजन शोल्डर म्हणतात.
सततच्या वेदना आणि मंदावलेली खांद्याची हालचाल हे लक्षण प्रामुख्याने फ्रोजन शोल्डर आजारात बघायला मिळते.

काळजी/ उपचार
सकस आहार, नियमित रक्तातील साखर तपासणी, फॅमिली मध्ये कोणाला आई वडिलांना काका मामा यांना मधूमेहाचा आजार असेल‌ तर नियमित रक्तातील साखर तपासणी करणे आवश्यक आहे. आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले आढळून आले तर तात्काळ वैद्यकीय विषयातील तज्ज्ञ मंडळींकडून उपचार सुरू करणे. आहाराचे पथ्य पाळणे अनिवार्य आहे.

प्रत्येकाची शरिरातील परिस्थिती प्रत्येकाची प्रतिकारशक्ती भिन्न असते त्यामुळे आपली तब्येत आणि त्यांची काळजी औषधे आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

नियमित व्यायाम करणे, स्नायू बळकट होण्यासाठी प्रयत्न करणे, योगासने/ प्राणायाम/ सुर्यनमस्कार, सकस आहार, यांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमित रक्तातील साखर तपासणी आणि वैद्यकीय विषयातील तज्ज्ञ मंडळींकडून उपचार हे महत्वाचे आहे.

Img 20230511 wa0002282296555721650380460122

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये