शिवम सुतार यांच्याकडून सुतारवाडी मधील रिक्षा चालकांना एक महिन्याच्या अन्नधान्याची मदत

पुणे : कोरोनाच्या काळा मधे सर्व रिक्षा चालकांचा धंदा ठप्प झाला आहे. त्यामुळे आज सुतारवाडी सुसरोड साई चौक, विघ्नहर्ता चौक, अभिनव काँलेज चौक, शिवशक्ती रिक्षा स्टँड परिसरातील सर्व रिक्षा चालवणाऱ्या 90 बांधवाना एक महीना पुरेल इतके अन्नधान्याचे रेशन देण्यात आले. शिवम आबासाहेब सुतार यांच्याकडून हि मदत करण्यात आली.
परिसरातील बांधिलकी जपून रहावी. म्हणून सतत कठीण काळामध्ये एक दुसऱ्यांना मदत करत राहावी.अशी शिकवण माझ्या वडिलांकडून आम्हांला मिळाली असे शिवम सुतार यांनी सांगितले त्यावेळी त्यावेळी आबासाहेब सुतार, स्विकृत नगरसेवक शिवम आबासाहेब सुतार, संतसेवक मारूती कोकाटे, दयनेश्वर भेगड़े,अंबादास कोकाटे,सुरेश कोकाटे, शिवशक्ती रिक्षा स्टँडचे अध्यक्ष राजाभाऊ सुतार, धर्मराज सुतार,सखाराम सुतार, कैलास गावडे, संतोष गावडे,दत्ता कोंढाळकर, प्रदीप नाथ,गणेश जाधव, नितीन दाभाडे,सौरभ सुतार,राहूल बहिरमे,राज क्षीरसागर आदि उपस्थित होते.




