वारजेत समस्त गुरव समाज एकवटला..दसरा मेळावा उत्साहात संपन्न

वारजे : अखिल गुरव समाज ट्रस्ट, (वारजे, पुणे) यांच्या वतीने वारजेत आयोजित करण्यात आलेल्या समाजाच्या दसरा मेळाव्यात पुणे शहरातील समस्त गुरव समाज एकवटला. एकमेकांना शुभेच्छा देत समाजबांधवांचा हा दसरा मेळावा उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला.

या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक बाबा धुमाळ, माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक सचिन दोडके, माजी नगरसेवक किरण बारटक्के, माजी नगरसेविका सायली वांजळे, सुनीता राजगुरु, माजी सरपंच अतुल दांगट, विकास दांगट, भारत भूषण बराटे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अखिल गुरव समाज ट्रस्ट ह्या नावाने ज्ञानेश्वर पारखे यांनी तयार केलेल्या फेसबूक पेज चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.



यावेळी संदीप जावरे व सहकारी यांनी “मन सरगम” नावाने संगीत मैफिल सादर केली. घेण्यात आलेल्या दांडिया व रास गरबा कार्यक्रमात उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या मेळाव्यात समाजातील एकी, परस्पर संवाद व भावी योजनांवरही चर्चा झाली. लवकरच समाजाच्या प्रगतीसाठी विविध विधायक उपक्रम राबविण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल गुरव समाज ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पाटील, सचिव दत्तात्रय गुरव, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम गवळी, उपाध्यक्ष गंगाधर पाटील, खजिनदार प्रदीप कुमार पाटील, उपाध्यक्ष अनंत पाटील, उप सचिव प्रदीप आलमले, तसेच सक्रिय सभासद प्रदीप जावरे, संदीप जावरे, संतोष पाटील, सतीश गुरव, सचिन बिराजदार, बळीराम भंडारकुमठे, लक्ष्मण डांगे या सर्वांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रदीप कुमार पाटील यांनी केले. राजश्री पारखे यांनी सूत्रसंचालन तर सपना डांगे यांनी आभार मानले.






