वडीलकीच्या नात्याने सणासुदीच्या काळात वस्ती विभागातील मुलींसाठी नवीन कपडे शिवण्याचा उपक्रम – चंद्रकांत पाटील.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिलाई मशीन भेट व ड्रेस शिलाईचे काम देखील देण्याचा अभिनव उपक्रम
पुणे : pune city, kothrud कोरोनाच्या संकटकाळात अनेक कुटुंब बेरोजगार झाले, लॉक डाऊनमुळे उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांची आर्थिक ओढाताण झाली. अशावेळी गरजूंना शक्य ती मदत पुरविण्याचा प्रयत्न केला, मात्र या दरम्यान असे लक्षात आले की ह्या संकटकाळात वस्ती विभागातील अनेक कुटुंबातील लेकींना नवीन कपडे सुद्धा शिवले गेले नाहीत आणि मग मनाशी निर्धार केला की सणासुदीच्या काळात ह्या सावित्रीच्या लेकींना उत्तम दर्जाचे कपडे भेट द्यायचे आणि म्हणूनच आज हा कार्यक्रम होतो असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी सांगितले.
पतित पावन संघटनेच्या माध्यमातून कोथरूडच्या जय भवानीनगर येथे मुलींना शिलाईसह मोफत ड्रेस वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका छाया मारणे, वासंती जाधव, शहर सरचिटणीस, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, डॉ. संदीप बुटाला, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, पतित पावन संघटनेचे कोथरुड अध्यक्ष सुनील मराठे , श्रीकांत शिळमकर ,संतोष रायरीकर, संतोष अमराळे, मिताली सावळेकर, अनिता तलाठी, सुरेखा जाधव, कल्याणी खर्डेकर, अभिजित राऊत आदी उपस्थित होते.
यापुढील काळात शाळा सुरु झाल्यावर मुलींनी मला पत्र पाठवून त्यांना ज्या साहित्याची गरज आहे ते मला लिहून कळवावे, जे जे कमी असेल ते ते देण्याचा मी प्रयत्न करेन असेही पाटील यांनी घोषित केले.

वडीलकीच्या नात्याने आणि पालक म्हणून या मुलींना नवीन कपडे शिवतानाच ह्या ड्रेस च्या शिलाईचे काम करून महिलांना आपल्या कुटुंबाचा आधार होता यावे यासाठी येथील बचत गटाच्या महिलांना 10 शिलाई मशीन भेट दिल्या असून शिलाईचे काम ही त्यांनाच देत असल्याचे पाटील यांनी सांगितले. टप्प्याटप्प्याने संपूर्ण कोथरूड मधील गरजू मुलींना नवीन कपडे शिवणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन पतित पावन संघटनेचे कोथरुड अध्यक्ष सुनील मराठे यांनी केले होते.



