विठ्ठल बराटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा..

कोथरुड : भाजपचे कोथरूड विधानसभा मतदार संघाचे सरचिटणीस विठ्ठल बराटे यांचा वाढदिवस कोकण पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिर, सावली सामाजिक संस्थेस मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. Vitthal Barate’s birthday celebrated with various social activities ..
वाढदिवसाचे औचित्य साधत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण पूरग्रस्त भागात 200 कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच सावली बहुविकलांग प्रतिष्ठान येथे स्टीमर व धान्य वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमधील रक्तसाठ्याचा तुटवडा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 121 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी नगरसेवक राजाभाऊ बराटे, दीपक पोटे, भाजपा कोथरूड विधानसभा अध्यक्ष पूनित जोशी, राहुल देशपांडे, पुणे शहर वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, भाजपा कोथरूड विधानसभा चिटणीस विशाल रामदासी, भाजपा युवा सरचिटणीस ऋषिकेश बराटे, तसेच प्रकाश डोख, नरेंद्र पडवळ, शशिकांत शिंदे, संदीप खुटाळे, चंद्रकांत धोत्रे, संग्राम दळवी, संजय काळे, रोहित मानकर, अतुल भालेकर, बाळासाहेब बुरंगे, अशिष झेंडे, सचिन बराटे, गणेश गायकवाड, विकास डोख, गणेश सावंत, योगेश गुर्जर, अजय बराटे, सौरभ बराटे, विष्णू वांजळे, मंगेश नवघने, कपिल ठोंबरे, सुमित निकम, नितीन चव्हाण, भारत साळुंके, अतुल खाटपे, नितीश बराटे, भागेश सुतार आदी उपस्थित होते.




