पुणे शहर

पुण्यात 12 लाखांचे ड्रग्ज जप्त

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेल्या मुंबईतील एकाला राज्य दहशतवादविरोधी पथकाने पकडले आहे. त्याच्याकडून ११ लाख ८० हजार रुपयांचे ११८ ग्रॅम एम डी (मेफेड्रोन)  जप्त करण्यात आले. महंमद फारुख महंमद उमर टाक (वय ४३, रा. म्हाडा कॉलनी, अंधेरी पश्चिम, मुंबई, मूळ रा. राजस्थान) असे अटक केलेल्या अमली पदार्थ तस्कराचे नाव आहे.

दहशतवाद विरोधी पथकाला मालधक्का चौकात एक संशयित व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकाने तेथे सापळा रचून महंमद टाक याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ११ लाख ८० हजार रुपयांचे ११८ ग्रॅम एम डी अंमली पदार्थ सापडले. त्याच्याकडून मोबाईल, डिजिटल वजन काटा, २ हजार ५९० रुपये रोख, आधारकार्ड, डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.   

याबाबत पोलीस हवालदार अशोक पेरणेकर यांनी दहशतवाद विरोधी पथकाच्या मुंबई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक संतोष सुभाळकर, सहायक निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस नाईक गायकवाड, पोलीस हवालदार पेरणेकर,शिंदे, गुंजाळ यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक विश्वास भास्कर तपास करीत आहेत.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये