पुणे शहर

एकता प्रतिष्ठानकडून आरोग्य सेविका नवदुर्गांचा सन्मान

महर्षीनगर– महर्षीनगर भागात यावर्षीचा नवरात्र उत्सव शासनाचे नियम पाळत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. दरवर्षीच्या उत्साहाच्या कार्यक्रमांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्थगिती देत सामाजिक बांधिलकी जपत उपक्रम राबवले. या भागातील एकता प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना काळात काम करणाऱ्या आरोग्य सेविका नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बिबवेवाडी प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका  राजश्री शिळीमकर, पर्वती महीला अध्यक्ष अनिता दिक्षीत, भाजपा झोपडपट्टीचे किरण वैष्णव, महेश सकट, पर्वती आरपीआयचे बाळासाहेब शेलार, भागातील महापालिकेचे मुकादम संतोष पितळे, सचिन खंडागळे, महेश सांळुखे, एकता प्रतिष्ठान पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमचे आयोजन गुलटेकडी एकता प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष गणेश शेरला यांनी केले होते.

गणेश शेरला म्हणाले कि, दरवर्षी नवरात्रमध्ये देवीला आम्ही तोरण अर्पण करतो. यंदा मंदिर बंद असल्याने देवीचे तोरण आम्ही कष्टकरी नव दुर्गांना अर्पण केले. करोना सारख्या महामारीतून सुखरूप पणे बाहेर पडण्यासाठी आरोग्य सेविकांनी दिलेल्या योगदानाची इतिहासात नोंद राहील. म्हणूनच आम्ही अशा उपक्रमाद्वारे नवरात्र साजरा केल्याने समाधान वाटत आहे.

भारतीय जनता पार्टी पुणे शहर झोपडपट्टी आघाडी व गुलटेकडी एकता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

7 12
Screenshot 2020 10 11 11 07 57 41 2
Screenshot 2020 10 12 12 19 40 67

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये