पुणे शहर

राष्ट्रवादी काँग्रेस कर्वेनगर प्रभाग ३६ च्या अध्यक्षपदी प्रतीक नलावडे यांची निवड

कर्वेनगर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) कर्वेनगर प्रभाग ३६ च्या अध्यक्षपदी प्रतीक नलावडे यांनी निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्त पत्र देण्यात आले.

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार व पुणे शहराचे अध्यक्ष दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनानुसार आपण पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहाचावणार असून प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहणार आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नलावडे यांनी निवडीनंतर सांगितले.

Img 20231111 wa0004281293263544100257595665

नुकताच कोथरूड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य मेळावा पार पडला. यात कोथरूड मतदार संघाची मजबूत पक्ष बांधणी करत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्या माध्यमातून पक्षाच्या विचारांना मानणाऱ्या, सामाजिक प्रश्नांची जाण असणाऱ्या कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती करत पक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली.

Img 20230511 wa0002282292722773256594657904
Img 20230717 wa0012281294586790481769091554

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये