आरोग्य

पावसाचा आनंद लुटा पण आरोग्याची काळजी घेत…

जून महिना आला की पावसाची चाहूल लागते. उन्हाळ्यातील प्रखर उन्ह आणि नंतर येणारा सर्वांचा आवडता ऋतु पावसाळा. नेहमी पावसाळा आला की गृप सहली, पर्यटन, मस्त पाऊस व गरमागरम चहा, भजी पकोडे, मका कणिस आणि बरेच काही…..
आता तर सामान्य माणंस गेली साधारण दीड वर्ष झाले घरात आहेत. आता लाॅकडाऊनचा काळ संपला आहे. अनलाॅक सुरू आहे. कोरोना रुग्ण कमी होऊ लागल्याने निर्बंध शिथिल होऊ लागले आहेत. मग सहाजिकच ह्या पावसाळ्यात घराबाहेर पडून मौजमजा पर्यटन, सहल ह्याचे प्रणाम वाढणार हे नक्की….Enjoy the rain but take care of your health …

Img 20210616 wa0110

परंतु दरवर्षी आपण पावसाळा आला की आपल्या शरीराची काय काळजी घ्यावी ह्या बाबात सविस्तर चर्चा करतोच, परंतु ह्या वर्षांत आपल्याला पावसाळ्यातील आजार बाबात जनजागृती तर आहेच पण कोरोना संसंर्ग नियम पाळून आपले जीवन जगायचे आहे.  पावसात मस्त भिजणे हे तर लहान मुले, तरूण व ज्येष्ठांनाही आवडते. पण पावसात भिजून आनंद लुटत असताना आरोग्याची काळजी ही घेणे तितकेच गरजेचे आहे.

Img 20210522 wa0203


साधारणपणे पावसाळ्यात होणारे आजार म्हणजे थंडी ताप, खोकला , दमा, पोटात दुखणे, संडास उलटीचा त्रास होणे, पायाला जखमा, तळपायाला भेगा पडणे, मलेरिया/ हिवताप.

पावसाळ्यातील आजाराची करणे
पावसाळ्यात सर्वत्र पाणी जमा झाल्यामुळे घाणीचे साम्राज्य तयार होते त्यामुळे थंडी तापाचे रुग्ण वाढतात कारण डासांचे प्रमाण वाढलेले असते. परिणामी होणारा मलेरिया, हिवताप आजारचे रुग्ण वाढतात. भारतात दरवर्षी आजही मलेरिया हिवताप मुळे हजारो लोकांचा बळी जातो.

परंतु ह्या वर्षी आपल्याला  पावसाळ्यातील मलेरिया हिवताप सोबतच सामाईक लक्षणे असणाऱ्या  कोरोना संसंर्ग सोबत लढायचे आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यातील अजून एक महत्वाचा आजार म्हणजे डायरिया. दूषित पाण्यापासून होणारा आजार संडास उलटी चा त्रास. आज भारतातील बर्‍याच भागात दुषित पाणी पिऊन हजारो रूग्ण डायरिया चे शिकार होतात व काही प्रमाणात लवकर उपचार न मिळाल्यास मृत होतात.

पावसाळ्यातील दमट हवामानमुळे दम लागणे,
श्वसनाचा त्रास होणे या आजारात पण वाढ होत असते. पावसाळ्यातील भ्रमंती, भटकंती मध्ये घराबाहेरील कमी शिजवलेले शिळे अन्न उघड्यावरील माश्या बसलेले अन्न खावून बरेच जण आजारी पडतात….

पावसाळ्यात  घ्यावयाची काळजी..
पावसाळ्यातील मौज मजा नक्कीच केली पाहीजे, पण आपली व आपल्या परिवारातील सदस्यांची तब्येत ठीक राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
जसे की पाणी उकळून गरम करून गार करून पिणे,
आपल्या परिसरातील घाण साफ करून घेणे ज्यायोगे डासांची उत्पत्ती होणार नाही म्हणजे डेंग्यू, मलेरिया
सारखे आजार होणार नाहीत. पावसात भिजणे शक्यतो टाळावे अथवा भिजून होताच ओले कपडे बदलणे, डोके कोरडे करणे खूप आवश्यक आहे. नाहीतर आपण थंडी ताप सारख्या आजारांना आमंत्रण दिल्या सारखे होईल.

दमा अस्थमा सारखा आजार असणाऱ्यांनी तर जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. बाहेरील, उघडे, तळलेले माशा बसलेले अन्न खाणे टाळले पाहीजे. घरात डास प्रतिबंध खिडकी जाळी वापरली पाहीजे, ह्या वर्षा पावसाळ्यात आपल्याला खूप काळजीपूर्वक रहायचे आहे..दरवर्षी पावसाळ्यातील आजार व पुर्णपणे न संपलेली कोरोनाची साथ त्यामुळे खबरदारी आवश्यक आहे.

लाॅकडाऊन उठवला गेला आहे हे मान्य आहे,परंतु थोडासा संयम बाळगून सामाजिक भान, कुटुंबातील सदस्यांची काळजी व आपल्या आरोग्याची काळजी घेत पावसाळ्यातील मौजमजा करा. दरवर्षी पावसाळ्यात जर कोणाला थोडा थंडी ताप आला तर आपण तो घरातच बसून किरकोळ घरगुती उपचार करून घेत, परंतु कोरोना संसंर्ग काळ आहे शक्यतो घरातच बसून उपचार करणे, अंगावर आजार काढणे शक्यतो ह्या वर्षी टाळाच. वैद्यकीय विषयातील तज्ज्ञ मंडळी,नफॅमिली डॉक्टर कडून उपचार करून घ्या.
डाॅ.सीमा पाटील
डाॅ.मिलींद पाटील
ओम हाॅस्पीटल बावधन

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये