उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजपाचा स्तुत्य उपक्रम

कोथरुड : पंडित दीननदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त संकल्पपूर्ती युवा फौंडेशन व कोथरूड मतदारसंघ बूथ क्र २०० च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गरजू नागरिकांना धान्य किराणा किटचे वाटप भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आशिष कुलकर्णी, प्रा. संतोष रासकर, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, भाजपा सरचिटणीस गणेश घोष, नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष पुनीत जोशी, समीर पाटील, धनंजय जाधव, महिला आघाडी अध्यक्षा हर्षदा फरांदे , विठ्ठल बराटे , विशाल पवार , चंद्रकांत पोटे , संतोष लांडे , चंद्रभूषण जोशी , सचिन फोलाने , शशिकांत कांबळे , प्राची बगाटे , अपर्णा लोणारे , जनार्दन क्षीरसागर , श्रीकांत गावडे , वैभव जमदाडे , सौरभ अथनिकर , रामदास गावडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शंतनु खिलारे पाटील, राजेंद्र येडे, राजभाई तांबोळी, प्रा. अनुराधा येडके,
यांनी केले होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मानवतावादी एकात्मता अंत्योदय विचारधारा अनुसार समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत विकास पोहचला पाहिजे या प्रेरणेतून समाजातील गरीब गरजू नागरिकांना अत्यावश्यक किराणा किट वाटप केल्याचे शंतनु खिलारे यांनी सांगितले.



