महाराष्ट्र

अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसे बद्दलच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत दोन गट

मुंबई : कलाकारांचा वेष घेऊन गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही, अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे साकारलेल्या सिनेमाला विरोध करणारच अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याकडे कलाकार म्हणून पाहिले पाहिजे, अमोल कोल्हे एक गुणवंत कलाकार असल्याची प्रतिक्रिया दिली, तर जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेत कलाकारांचा वेष घेऊन गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही, सिनेमाला विरोध करणारच अशी भूमिका घेतल्याने राजकीय संभ्रम निर्माण झाला आहे आहे.

‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा 45 मिनिटाचा सिनेमा आहे. तो प्रदर्शित होत आहे असं मला समजलं. अमोल कोल्हे आज मला भेटले. तासभर आमची चर्चा झाली. ते पुण्यात एक प्रकल्प राबवत आहे. त्यावर चर्चा झाली. त्यांनी मला एक क्लिप दाखवली. त्यात ते गोडसेची भूमिका साकारत आहेत. अमोल कोल्हेंची खरी ओळख ही अभिनेता म्हणून आहे. ते लोकप्रिय आणि गुणी अभिनेते आहेत. अभिमान वाटावा असे कलाकार आहेत. त्यांची संभाजी मालिका सर्वजण पाहात असतात. अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. गोडसेंचा रोल केला असला तरी अभिनेत्याच्या अँगलने त्याकडे पाहिलं पाहिजे. ते कलावंत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कलेच्या भूमिकेतून पाहा, असं आवाहन टोपे यांनी केलं.

जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत म्हटले आहे की, डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही. विनय आपटे, शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केला, त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Img 20220119 wa0206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये