पुणे शहरातील दिव्यांगांसाठी ‘दिव्यांग सहाय्यता अभियानाचे’ उद्या आयोजन माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त पुण्यात ‘दिव्यांग सहाय्यता अभियान’ राबविले जात आहे. या अंतर्गत २ हजार दिव्यांगांसाठी सुसह्य उपकरण वाटप, दिव्यांग रोजगार नोंदणी-मार्गदर्शन शिबीर आणि कृत्रिम अवयव मोजमाप आणि नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भाजप सरचिटणीस व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
सदर अभियान देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस दिनी म्हणजे २२ जुलै रोजी सायंकाळी एरंडवणे येथील ४ वाजता म्हात्रे पुल डी.पी. रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मोहोळ म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून पुणे शहरातील दिव्यांग बांधवांना मदत करणे त्यांना आधार देणे आणि आत्मनिर्भर करणे या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात 2000 दिव्यांगाना सुसह्य उपकरण वाटप, दिव्यांग रोजगार नोंदणी, कृत्रिम अवयव मोजमाप आणि नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
















