राष्ट्रीय

मणिपूरमध्ये धिंड काढलेल्या महिलांमधील एक महिला कारगिलमध्ये लढलेल्या माजी सैनिकाची पत्नी

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच या पीडित महिलांमधील एक महिला कारगिल युद्धात सहभाग घेतलेल्या माजी सैनिकाच्या पत्नीचा असल्याचे समोर आले आहे.

Screenshot 2023 07 17 18 08 38 30

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. पीडित महिलेने त्यांच्याशी बोलताना सांगितले की, आम्हा दोघी महिलांना हजारो पुरुषांच्यासमोर बंदूकीच्या धाकाने अंगावरील कपडे काढले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी आम्हाला त्रास दिला आमची धिंड काढली.

Img 20230707 wa00097391429386569165714

चुराचंदपूर येथील एका मदत शिबिरात आसरा घेतलेल्या माजी सैनिकाने (वय ६५) सांगितले की सांगितले की, माझ्या पत्नीला या घटनेचा मोठा धक्का बसला होता. मात्र आमच्या मुलांकडे पाहून त्यांच्यासाठी ती पुन्हा जगण्यासाठी बळ एकवटू पाहत आहे. ते म्हणाले 3 आणि 4 मे रोजी हजारोंच्या संख्येने लोकांच्या झुंडीने गावावर हल्ला केला. घरे, एक चर्च आणि अनेक पाळीव जनावरे त्यांनी मारुन टाकली. तो जमाव 4 मे रोजी आमच्या गावात आला आणि घरे जाळणे सुरु केले. त्या भीतीने अनेक लोक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत सुटले. माझ्या पत्नीची आणि माझी चुकामुक झाली. त्यावेळी ती आणि गावातील चौघेजण जंगलातील एका झाडाच्या पाठीमागे लपून बसले. काही हल्लेखोर आमच्या पाळीव जनावरांचा (डुक्कर, बकऱ्या, कोंबड्या)चा पाठलाग करत असताना जंगलात घुसले. यावेळी जंगलात लपलेल्या माझ्या पत्नीला आणि चार जणांना त्यांनी पाहिले आणि पकडले.

Img 20230708 wa0003

पीडित महिलेच्या पतीने सांगितले की, माझी पत्नी आणि आणि दुसरी एक महिला तसेच तिचे एक लेकरु, आणि दुसऱ्या एका कुटुंबातील तिघे (वडील, मुलगा आणि मुलगी) होते. त्यांना जेव्हा बाहेर आणले तेव्हा पोलिसांचे एक वाहन तेथे दिसले ते काही प्रयत्न करणार पण जमावाने पोलिसांना न जुमानता त्यांनी माझ्या पत्नीला आणि इतर चौघांना वाहनातून बाहेर ओढले.

Img 20230511 wa0002281296351682306326034196

त्यानंतर तीन महिलांना कपडे काढण्यास सांगितले. एका महिलेच्या काखेत लहान मुल होते. तिला जमावातील काही लोकांनी जाण्यास सांगितले. तर जमावातील काही जण दुसऱ्या तरुणीसोबत छेडछाड करत होते. त्यावेळी तिच्या वडिलांनी आणि भावाने त्याला विरोध केला तेव्हा त्यांना मारुन टाकण्यात आले.

एफआयआरमध्ये नमुद केल्याप्रमाणे, नंतर जमावाने त्या तरुणीवर सामुहिक बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, सामुहिक बलात्काराबाबत ठोसपणे सांगितले जावू शकत नाही, कारण ती तरुणी सापडलेली नाही. पिडीत महिलेचा पती माजी सैनिकाने सांगितले की, नंतर तिचा प्रियकर तिला सोबत घेऊन गेला. जवळपास दोन ते तीन तास तिच्यासोबत दृष्कृत्य करण्यात आले. आम्ही डोंगरात आसरा घेतला. रात्री मी माझ्या पत्नीसोबत पुन्हा गावात आलो, तरुणीला तिचा प्रियकर घेऊन गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही चालत निघालो, त्यात काही गर्भवती महिला देखील होत्या. लोक वेगवेगळ्या दिशेने निघून गेल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये