कोथरुड

कोथरूडमध्ये सागर कॉलनीत गॅस सिलेंडरचा स्फोट ; घरातले बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला..

कोथरूड : कोथरूड मधील सागर कॉलनीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागून घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले सागर कॉलनीत राहणाऱ्या भंडारी यांच्या घरात ही घटना घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार घरातील गॅस सिलेंडर संपल्याने त्या ठिकाणी नवीन गॅस सिलेंडर बसवत असताना त्यामधून मोठ्या प्रमाणावर गॅस बाहेर पडला. या प्रकारामुळे घरातील सर्व खाली आले व याबाबतची तक्रार एजन्सीकडे देऊन परत घरी जाण्याअगोदरच स्फोट घडला. सुदैवाने सर्वजण खाली असल्याने मोठा अनर्थ टळला.

गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच कोथरूड अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचून त्यांनी आग आटोक्यात आणली. याबाबत कोथरूड अग्निशमन दलाचे गजानन पाथरुडकर यांनी सांगितले की, गॅस सिलेंडर बदलत असताना त्यातून प्रेशरने गॅस बाहेर पडला त्यामुळे घरातील सर्वजण खाली आणि स्फोट झाला. स्फोटामुळे घराच्या दरवाजाचे तुकडे झाले असून लोखंडी ग्रिल ही तुटून पडले आहे. भिंतीला तडे गेले आहेत. कोथरूड अग्निशमन दलाने घटना स्थळी पोहचून आग आटोक्यात आणली व सिलेंडरचा मोकळ्या मैदानात नेऊन रिकामा केला. गजानन पाथरुडकर यांच्यासह अमोल पवार, योगेश चव्हाण, पानसे, अवरगंड यांनी आपले कर्तव्य बजावले.

Img 20230717 wa0012281298961742807603730839
Img 20240112 wa00117432465346424159719
Img 20231112 wa00053541767882370111537
Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये