पुणे शहर

पुणे महानगरपालिका मिळकत करामध्ये देत असलेली ४०% सवलत परत सुरू करावी- शिवा मंत्री

पुणे : पुणे महानगरपालिका शहर वासीयांना गेली अनेक वर्ष मिळकत करामध्ये ४०% सवलत देत असे. परंतु काही वर्षापूर्वी ही महापालिकेने ४०% सवलत काही कारण नसतांना अचानकपणे रदद् केली. हा वेळेवर मिळकत कर भरणाऱ्या पुणेकर नागरीकांवर अन्याय आहे. तरी पुणे महापालिकेने हि सवलत तातडीने सुरू करावी. अशी मागणी माजी नगरसेवक शिवा मंत्री यांनी केली आहे.

मंत्री म्हणाले, ही ४०% सवलत रदद् केल्यामुळे नागरीकांच्या करामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कोरोनामुळे नागरीकांचे आर्थिक नुकसान झाले आहे व त्यामुळे नागरीक आर्थिक संकटात आहेत. याशिवाय वाढत्या महागाईमुळे नागरीक अत्यंत त्रस्त आहेत. मिळकत कर सवलत रदद् केल्यामुळे पुणेकर नागरीकांमध्ये संतप्त भावना आहेत.

पुणे महानगरपालिकेचा हि कर सवलत परत मिळावी म्हणून सर्वसाधारण सभेचा ठराव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. परंतु अद्याप त्यावर राज्य सरकार कडून निर्णय
घेण्यात आलेला नाही. माझी आपणास कळकळीची विनंती आहे की, यावर आपण तातडीने निर्णय घेउन मिळकत करामधील ४०% सवलत पुन्हा देउन पुणेकरांवरील अन्याय दुर करून त्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी मंत्री यांनी केली आहे.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये