राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांची आयुक्तांच्या निमंत्रणावरून भेट; कोणाची मध्यस्थी नाही राष्ट्रवादी कडून भुमिका स्पष्ट

पुणे : सत्ता राज्यातील सत्ता बदलाचा स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या राजकारणावर देखील पाहायला मिळत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकांनी बोलावलेल्या बैठकीला पुणे महानगरपालिकेचे आयुक्त उपस्थित राहणार होते. या बैठकीला न बोलावताच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी आपल्या महत्त्वाच्या परिसरातील कार्यकर्त्यांसोबत बैठकीला हजेरी लावली. अशी चर्चा होती.
मात्र महापालिका आयुक्त विक्रमकुमार पाणी प्रश्ना संदर्भात बाणेर – बालेवाडी भागातील पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी याबाबत माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनाही याबाबत माहिती दिली होती. त्या नुसार हि नियोजित भेट होती. चांदेरे हे ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांना आयुक्तांना भेटण्यासाठी कोणत्याही मध्यास्थीची गरज नसल्याचे राष्ट्रवादीच्या विशाल विधाते यांनी सांगीतले आहे.
या बैठकीमध्ये भाषणादरम्यान चांदेरे म्हणाले की आमदार हे सर्वांचेच लोकप्रतिनिधी असतात यामुळे आम्ही न बोलावता देखील या बैठकीला उपस्थित राहिलो. वास्तविक पाणी प्रश्नाबाबत यापूर्वी माजी पालकमंत्री व विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी मोठ्या प्रमाणात तरतूद केल्याचे सांगितले आहे. असे असतानाही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पाणी प्रश्नासाठी भाजपाच्या व्यासपीठाचा आधार घ्यावा लागला व आयुक्त यांना भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून भेटावे लागले. अशी चर्चा रंगली होती.

यामुळे राज्यातील राजकीय गाठीभेटीप्रमाणे हा देखील विषय स्थानिक पातळीवर होऊ घातलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने त्याची चर्चा रंगताना पाहायला मिळत होती.



