पुणे शहर

वारजे जकात नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाच्या वतीने रिक्षाचालकांना प्रशांत जगताप यांच्या हस्ते मोफत हुड वाटप

प्रमोद शिंदे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

वारजे : वारजे जकात नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे प्रमोद शिंदे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते रिक्षा चालकांना मोफत रिक्षा हुडचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने, पुणे शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक कामठे, कोथरूड मतदार संघाच्या महिला अध्यक्षा ज्योती सूर्यवंशी, मनाली भिलारे, भक्ती कुंभार, ऋतुजा देशमुख, आदिराज कसबे, पियुष हनवंते, राहुल खंदारे, योगेश निंबरे, विनायक देशमुख, वैभव कोठुळे, दीपक चांदगुडे, हर्षल बराटे, साहिल कांबळे, रोहन पायगुडे, माऊली वाकसे, सत्यजीत हिरवे, पंकज कदम, लखन लोखंडे, राम सरवदे तसेच जय महाराष्ट्र ऑटो रिक्षा संघटना वारजे जकात नाकाचे सर्व सभासद  उपस्थित होते.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

यावेळी पक्षाचे चिन्ह असलेल्या तुतरीच्या ललकारित कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. रिक्षा चालक हे पुणे शहराची जीवन वाहिनी असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष कायम त्यांच्यासोबत उभा राहिला आहे अशा भावना यावेळी उपस्थिती मान्यवरांनी व्यक्त केल्या. यावेळी चांगल्या दर्जाचे हुड दिल्याने रिक्षाचालकांनी समाधान व्यक्त केले.

Img 20240308 wa0011701274730950524313
Img 20240308 wa0009967293088052154082
Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192
Img 20240202 wa00026664518766032457834

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये