कोथरूड मधील शिवतीर्थनगर गणेश मंदिरात गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा

पुणे : श्री गजाननाच्या नामाचा जयघोष करीत शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिरामध्ये श्री गणेश जन्मोत्सव आज मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिरामध्ये माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्या पुढाकारातून सालाबादप्रमाणे श्री गणेश जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवातील आजच्या कार्यकमामाची सुरुवात गणेशभक्तांनी वर्षभर केलेली अथर्वशीर्ष जपसं‘या श्रींना अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर अर्थवशीर्ष सहस्त्रावर्तन झाले. हिमांशु देशपांडे यांच्या हस्ते आरती झाली. तसेच धार्मिक कार्यकमांचे आयोजनही करण्यात आले होते.
स्मिता विलास देशपांडे यांचे गणेश जन्मोत्सव कीर्तन झाले. त्यांना रंगनाथ कुलकर्णी (तबला), उमाशंकर बेलवाले (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली.श्री गणेश जन्मसोहळ्याला उद्योजक प्रविण बढेकर, शिवाजी चौधरी, हर्षदा माथवड यांची प्रमुख उपस्थिती होती. गणेश भक्त राजेंद्र शेडगे आणि वसुंधरा शेडगे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.
मान्यवरांचा सत्कार श्याम ओझा, बेबीताई शिंदे, ॲड. पंकज सुतार, केसुबाई जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यकमाचे सूत्रसंचालन उत्सव कमिटी प्रमुख डॉ. संदीप बुटाला यांच्या हस्ते झाले. दुपारच्या सत्रात श्री कलावतीमाता भजनी मंडळाचे भजन, मेघा नारखेडे व सहकार्यांचे अथर्वशीर्ष पठण तर सायंकाळच्या सत्रात शिवतीर्थनगर भजनी मंडळाचे भजन झाले. त्यानंतर डॉ. संदीप बुटाला व मनिषा बुटाला यांच्या हस्ते आरती झाली.
