पुणे शहर

पुरेशी काळजी घेत बाप्पाला निरोप द्या – मानकर

पुणे : यंदाचा गणेशोत्सव पुणेकरांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने पण उत्साहात साजरा केला आहे. उद्या विसर्जनाच्या दिवशी ही नागरिकांनी व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुरेशी काळजी घेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा असे आवाहन माजी उपमहापौर, नगरसेवक दीपक मानकर यांनी केले आहे.

यंदाचा गणेशोत्सव सर्वांनीच साध्या पद्धतीने साजरा केल्याने आपण कोरोनाला या उत्सवाच्या काळात अटकाव घालू शकलो. कोणत्याही आपत्तीच्या काळात गणेश मंडळाचे कार्यकर्ते धावून येतात आपला इतिहास आहे. या संकटाच्या काळातही मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला समाज कार्याचा इतिहास जपला आहे.

विसर्जनाच्या दिवशी एकाच ठिकाणी जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यायची असून सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळायचे आहेत. दहा दिवस आपण खूप चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा केला आहे. शेवटच्या दिवशी ही तेवढीच खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे. बाप्पा नक्कीच लवकरच हे कोरोना चे संकट दूर करेल. असे मानकर यांनी म्हंटले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये