कोथरूडमध्ये दिव्यांगांच्या हस्ते ध्वजारोहण व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची आरती

कोथरूड : छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित दिव्यांगांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची आरतीही दिव्यांगाच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, कोथरुड- बावधन क्षेत्रिय अधिकारी केदार वजे, मनसेचे संजय काळे आदी उपस्थित होते. वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केल्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
प्रतिष्ठानच्या वतीने विराज डाकवे यांनी सूत्रसंचालन केले व प्रतिष्ठान चे संस्थापक सुशांत जाधव, सचिन मोहोळ,मनोज कदम ,अभिषेक खोमने, हनुमंत मारणे, ओंकार ठाकूर, पै.गणेश शिंदे, दत्ता गावडे, किरन चोरघे, वैभव झोंबाडे, सुनील सावळे, स्वप्नील पवळे, सानिध्य वाघचौरे, प्रथमेश मोकाटे, ऋषिकेश दळवी , दीपक खेंगरे , साई मोहोळ , राहुल जोरी, कुणाल शेडगे, हिंदवी मोहोळ, श्रावणी नाकती, सिद्धी माने, आर्पिता लंबाटे, प्रिती गोसावी आदी सदस्यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.



