पुणे शहर

महामार्गाच्या कडेने रात्रीच्या वेळी कचरा टाकणाऱ्यांना दणका ; लपून बसून कचरा टाकणाऱ्यांना पकडले

कोथरूड : चांदणी चौक तर कात्रज बोगदा या टप्प्यात महामार्गाच्या कडेने रात्रीच्या वेळी नागरिक व व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने अस्वच्छता पसरत होती. हा प्रकार थांबवण्यासाठी कोथरूड – बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या रात्र पाळीच्या गस्ती पथकाने द्रुतगती महामार्गावर कचरा टाकून घाण करणाऱ्या बेशिसस्त नागरिकांवर दंड ठोठावत धडाकेबाज कारवाई करण्यात आली.

स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२३” अन्वये पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयीन आज्ञापत्रकानुसार रात्र पाळीमध्ये १ जानेवारी २०२३ ते ३० एप्रिल २०२३ अखेर पर्यंत आरोग्य निरिक्षक व मोकादम व हायवे अथॉरिटीचे दोन कर्मचारी असे गस्ती पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर गस्ती पथकाद्वारे रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत पुणे महानगरपालिका हद्दीतील चांदणी चौक ते कात्रज बोगदा महामार्ग व सेवा रस्त्यावर राडारोडा व कचरा टाकून अस्वच्छता करणार्‍या बेशिस्त नागरिकांवर बेधडक दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या गस्ती पथकाच्या माध्यमातून जोरदार बेधडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सदर द्रुतगती महामार्गावर सर्रास दुचाकी व चार चाकी वाहनातून बावधन, वारजे, माळवाडी, वडगांव, नऱ्हे, आंबेगाव, जांभूळवाडी परिसरातील व्यवसायिक नागरिक तसेच महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा फळ विक्री व भाजी विक्री करणारे विक्रेते, आयटी क्षेत्रात काम करणारे, भाडयाने राहाणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी शिवाय पर राज्यातील कामानिमित्त आलेले नागरिक शिवाय लहान मोठे हॉटेल व्यवसायिक रात्रीच्या ११ ते १ वाजताच्या दरम्यान कचरा टाकून घाण करतात. अशा बेशिस्त नागरिकाना गस्ती पथकातील कर्मचारी व अधिकारी हे गनिम काव्याने लपून कचरा टाकणाऱ्‍या नागरिकांना पकडून दंडात्मक कारवाई करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे.

घाण करणाऱ्या नागरिकांना गांधीगिरीच्या माध्यमातून आपले पुणे शहरातील द्रुतगती महामार्ग व सेवा रस्ते स्वच्छ ठेवा, रस्त्याच्याकडेला कचरा टाकू नका, आपले पुणे शहर स्वच्छ ठेवा, आपल्या दारी येणाऱ्या स्वच्छ सहकारी संस्थेच्या स्वयंसेवकाला वर्गीकृत कचरा द्या, आपली मातृभूमी घाण करू नका, आपले महामार्ग स्वच्छ व सुंदर ठेवा अशा प्रकारचे प्रबोधनही करण्यात येत आहे.

Fb img 1648963058213

कचरा टाकणार्‍या भाडेकरूच्या घरमालकांना बोलावून त्यांना देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर रात्र पाळीत गस्ती पथकाच्या माध्यमातून या चार दिवसात कचरा टाकणाऱ्या एकूण ३९ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून ५७००/- रुपये शुल्क वसूल करण्यात आले. सदर कारवाई महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे मोकदम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे तसेच द्रुतगती महामार्गाचे रुतिक शिंदे, अभय डिंबळे या गस्ती पथकाने केली.

Img 20230126 wa00008877313132605679443

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये