पुणे शहर

कर्वेनगर मध्ये टोळक्याचा धुडगूस ; वाहनांची तोडफोड, युवकावर हल्ला : पोलिसांनी सहा जणांना घेतले ताब्यात

कर्वेनगर : कर्वेनगरमधील कॅनॉल रस्त्यावरील गल्ली नबंर ४ येथे आरोग्य कोठीजवळ टोळक्याकडून सोमवारी रात्री १० ते १२ वाहनांची तोडफोड करण्यात आली असून एका युवकावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने कर्वेनगर परिसरात भीतीचे वातावरण आहे. अशा घटनांमुळे पोलिसांचा धाक राहिला नसल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कर्वेनगर येथील कॅनॉल रस्त्यावर रात्री उशिरा हा प्रकार घडला असून अज्ञातांच्या हल्ल्यात अनुप वाळुजंकर हा युवक गंभीर जखमी झाला आसून त्याच्या उजव्या हाताचा अंगठा तुटला असल्याचे सांगितले जात आहे. कर्वेनगर मधील कॅनॉल रस्त्यावर अवैध व्यवसाय सुरू असून त्यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे बोलले जात आहे. रात्री अपरात्री कॅनॉल रस्त्यावर दारूची विक्री होते मात्र पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर वारजे पोलिसांनी एका सी सी टी व्ही फुटेज च्या आधारे मिळालेल्या माहितीवरून सहा जणांना ताब्यात घेतले असून दोघांचा शोध सुरू आहे.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

कालच वारजे माळवाडी येथील रामनगर परिसरात सात वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार घडला होता लगेच आज कर्वेनगर मध्ये १० ते १२ वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने असे प्रकार करणाऱ्याच्या मनात पोलिसांची भीती नाही का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

सोमवारी रात्री एक वाहन चालक त्याचा वाहनात बसला होता. आठ ते दहा जण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी रस्त्याजवळ थांबलेल्या वाहनांवर कोयत्याने आणि दगडफेक करत नुकसान केले. यात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये