२४ व्या नॅशनल स्क्वे मार्शल आर्ट चॅम्पीयनशीप स्पर्धेत कर्वेनगरमधील अनन्या दीपक निकटे हिला सुवर्ण पदक

पुणे : जयपूर, राजस्थान येथे पार पडलेल्या २४ व्या नॅशनल स्क्वे मार्शल आर्ट चॅम्पीयनशीप स्पर्धेत महाराष्ट्र राज्याकडून ११ वर्षांखालील गटात खेळताना कर्वेनगरमधील अनन्या दीपक निकटे हिने सुवर्ण पदक पटकावले आहे.
अनन्या दीपक निकटे ही कोथरूड मधील बी.व्ही.बी. चे परांजपे विद्या मंदीर शाळेची विद्यार्थिनी असून ती ५ व्या इयत्तेत शिकत आहे. स्क्वे मार्शल आर्ट खेळासाठी तिला श्रीधर कामले व संतोष वरघडे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. मिळवलेल्या या यशाबद्दल अनन्याचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.

राजस्थान येथे पार पडलेल्या २४ व्या नॅशनल चॅम्पीयनशीप स्क्वे मार्शल आर्ट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याकडून ११ वर्षांखालील गटात खेळताना अनन्या दीपक निकटे हिने प्रतिस्पर्धी पंजाब, हरियाना, कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर च्या स्पर्धकांवर मात करत सुवर्ण पदक पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सुवर्ण ३, रौप्य पदक १, कांस्य पदक ६ मिळवत स्पर्धेतील द्वितिय क्रमांकाची ट्रॉफी पटकावली आहे.
श्रीधर कामले व संतोष वरघडे यांचे मिळालेलं मार्गदर्शन व आई वडिलांनी दिलेली साथ, माझ्या परांजपे शाळेतील शिक्षकांनी दिलेले प्रोत्साहन यामुळे मी हे यश मिळवू शकले आहे, अशा भावना अनन्या निकटे हिने व्यक्त केल्या आहेत.
स्पर्धेत महाराष्ट्राला मिळालेले यश
सुवर्ण पदक : अनन्या निकटे, ईश्वरी कोंढरे, सेजल गालिंदे
रौप्य पदक : सबुरी जाधव
कांस्य पदक : हर्षदा चव्हाण, आदिती चांदणे, वैष्णवी मानकर, रिदिशा भंडलकर, काव्या झगडे, शर्विल बोडके












