पुणे शहर
नगरसेविका वैशाली राजेंद्र मराठे यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस जनरल सेक्रेटरी पदी निवड

पुणे : नगरसेविका वैशाली राजेंद्र मराठे यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस जनरल सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी निवडीचे पत्र दिले आहे.
गेल्या दहा वर्षांपासून पुणे महापालिकेत कोथरूड भागातून वैशाली मराठे नगरसेवक म्हणून कॉग्रेसचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. महापालिकेत स्थायी समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. या निवडीमुळे कोथरूड कॉग्रेस मध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
वैशाली मराठे म्हणाल्या, पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.




