कर्वे संस्थेत कमवा व शिका योजने अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या मुलींचा महिला दिनी सन्मान..

तेजल मयुर दुधाने व प्रवीण दुधाने यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन..
कर्वेनगर : आज जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या संपदा बेकरीत कमवा व शिका या योजने अंतर्गत काम करणाऱ्या मुलींचा सन्मान तेजल मयुर दुधाने व प्रवीण दुधाने यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी गिरीष कुमठेकर , श्रीदेवी पाटील, छाया पाटील, पूजा गाडे, संदिप भोसले, गणेश गोकुळे, मोहन चव्हाण, अमित सोंडकर, संदीप शिंदे, सौरभ बल्लाळ, समीर मिसाळ, विक्रम ढोले, आमोद गुरव, सिद्धार्थ भालेकर आदी उपस्थित होते.










कर्वे संस्थेत शिकणाऱ्या बऱ्याच मुली ग्रामीण भागातील गरीब व अत्यंत गरजू कुटुंबातील आहेत. या सर्व मुली कमवा व शिका या योजने अंतर्गत काम करून शिकतात . त्यांच्यात शिक्षण घेण्यासाठी असणारी जिद्द वाखानण्यासारखी आहे. त्यामुळे आज महिला दिनी सन्मान करण्यात आल्याचे तेजल दुधाने यांनी सांगितले.
सदर मुली ११वी,१२वी, BA, B.com,B.C.A चे शिक्षण घेत काम करतात. आज महिला दिनाचे औचित्य साधून त्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांना शालेय साहित्य व मास्कचे वाटप करण्यात आले.






