पुणे शहर

मदतीस कारण की… पोलिस मित्र युवा महासंघाची सामाजिक बांधिलकी

पुणे : विशालजी कोंडे एक दिलखुलास व्यक्तीमत्व पण अचानक लॉकडाऊच्या काळात म्हणजे ६ जुन २०२० मध्ये डोके दुखायला लागले आणि २ दिवसांत अटॅक आला आणि मग मेंदू काम करायचा बंद झाला, आज त्यांच्या डोक्यात कवटी नाही. पण त्यांच्या पत्नी राजश्रीताई कोंडे यांच्यावर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी आली, सासू नवरा आणि २ मुले अश्या सुखी कुटुंबाला कुणाची तरी नजर लागली, आज दीपावलीच्या दिवशी घरातील पूजा उरकून पोलीस मिञ युवा महासंघ संघटनेचे पदाधिकारी किरकटवाडी येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पूर्ण दिवाळीचे फराळ, मिठाई आणि आमच्या संस्थेकडून रुपये ११०००/- आणि हो पुढील सर्व जबाबदारी पोलिस मिञ युवा महासंघ या आपल्या कुटुंबाने घेतली आहे.

प्रकाश शिंदे म्हणाले,  मिञांनो जरी आज दिवाळी असली तरी आपल्या आजूबाजूला कुणीतरी उपाशी झोपत आहे, जास्त काही करता येणार नाही, पण आपल्या खारीच्या वाट्याने त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरती एक समाधानाची झालर दिसली.
मित्रांनो आमच्या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे, जिथे कमी तिथे आम्ही.अशा या देवकार्यासाठी पोलिस मिञ युवा महासंघ तर आहेच पण तुम्ही सुद्धा तुमची खारीची मदत करू शकता.
गुगल पे/फोन पे 9960227894 असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.

Img 20201114 wa0195
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 35 pm
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
Screenshot 2020 1113 155835 1
Screenshot 2020 1113 155733
Screenshot 2020 1113 155704
Screenshot 2020 1113 160047

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये