पुणे शहर

मराठी चित्रपट निर्मात्यांचे देवीला गाऱ्हाणे..

चित्रपट निर्माते संदीप मोहिते-पाटील यांनी रांगोळीच्या माध्यमातून घातले देवीला साकडे.

सहकारनगर – कोरोनाच्या या महामारीने जवळपास सर्वच व्यवसायीकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची झळ फिल्म इंडस्ट्रीला देखील बसली आहे. सर्व व्यवहार ठप्प असल्याने या क्षेत्राशी निगडित अनेक जण हवालदिल झाले आहेत. मागील ८ महिन्यांपासून सर्व नाट्यगृह आणि सिनेमागृह पूर्णपणे बंदच होती. सध्या सरकारने अटी व नियमांवरती जरी परवानगी दिली असली तरी, अनेक सिनेमागृह चालूच झालेली नाहीत. महाराष्ट्राचा विचार केला तरी मराठी चित्रपट सृष्टीवर लाखो लोक अवलंबून आहेत. सुरवातीला अनेक संस्थांनी मदतीचा हात देऊ केला. परंतु जसजशी लॉकडाऊनची मुदत वाढत गेली तसतसे मदत करणारांचे हात देखील कमी होत गेले. 

Img 20201114 wa0195

सहकारनगर भागातील मराठी चित्रपट निर्माते संदीप मोहिते-पाटील यांनी अशा ह्या बिकट प्रसंगी देवीला  साकडे घालत तळजाई मंदिर परिसरात २४×३० फुटी रांगोळी काढून कोरोना सुराचा वध करण्याचे साकडे देवीला घातले आहे.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

सदर रांगोळी मयूर दुधाळ यांनी रेखाटली होती.
सर सेनापती हंबीरराव मोहिते या मराठी चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते-पाटील यांनी रांगोळी काढून त्यावर ‘कोरोनासुराचा वध करण्यासाठी “दार उघड बये…दार उघड..” अशी आर्त हाक घालून गोंधळीनी संभळ वाजवत देवीला साकडे वाहण्याचा प्रयत्न केला आहे.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 35 pm

यावेळी संदीप मोहिते पाटील म्हणाले की, चित्रपटगृह लवकरात लवकर सुरू होऊन परिस्थिती पूर्व पदावर यावी. चित्रपट सृष्टीवर अवलंबून असणारांचे हाल आता तरी थांबावेत. हीच देवीला प्रार्थना केली आहे. यावेळी चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते-पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा आणि डॉ. रणजीत निकम, सूरज भिसे, गणेश फणसे, राहुल नेवसे, चेतन चौहान, रणजीत ढगे पाटील आदी उपस्थित होते.

Screenshot 2020 11 13 14 56 16 15 1
Screenshot 2020 11 13 14 51 42 82
Img 20201114 wa0281
Screenshot 2020 1113 155933
Screenshot 2020 11 13 14 54 32 54
Screenshot 2020 11 13 20 57 37 21
Screenshot 2020 11 13 15 00 46 61

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये