विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांसाठी मदत कक्ष सुरू; संपर्कासाठी १९५० हेल्पलाईन

पुणे : विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)-२०२६ अंतर्गत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. मतदारांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन व सहाय्य मिळावे यासाठी १९५० हा हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे पुणे जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आले असून संबंधित संपर्क अधिकारी व त्यांचे मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे:
विधान सभा मतदार संघ १९५ जुन्नर – श्रीमती वंदना भांगरे – ९४०३६६८२२८, १९६ आंबेगाव – श्रीमती अंजली सालार – ८६६८४९७७९१, १९७ खेड-आळंदी – श्री. अजय उमंदे – ९६८९९३४३३७, १९८ शिरूर – सौरभ नावरकर – ९९२२९७९७८३, १९९ दौंड – नीलेश गाडगे – ८२०००८८९६०, २०० इंदापूर – सचिन सैबी – ९६८९८९५१३०, २०१ बारामती – अशोक सिरसाट – ९६८९९३६०५७, २०२ पुरंदर – राजेश यादव – ९८२३७२८८४८, २०३ भोर – दिलीप छत्री – ९८२२०१४४६०, वेल्हा – ललित कोरोसिया – ९९२१७६९९९७, मुळशी – मनिष खंडागळे – ९०२८७५१९९०, २०४ मावळ – सागर दिलीप शिंदे – ९०२८८२४५५६.
मदत कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका:
२०५ चिंचवड – राहुल शेडगे – ९९२२५०१९७७, २०६ पिंपरी – अतुल किर्वे – ९८६०३१०८६६, २०७ भोसरी – पंकज पवार – ९८२२२३५४८०.
मदत कक्ष, पुणे महानगरपालिका:
२०८ वडगाव शेरी – राहुल ताथवडे – ९६८९९१४१८८, २०९ शिवाजीनगर – राहुल भोईर – ९७६२७७२९३३, २१० कोथरूड – सागर पासलकर – ९८२२६१४१६०, २११ खडकवासला – मनोहर जगताप – ९८५०६३१०७१, २१२ पर्वती – अनिल चौधरी – ९९२२५०७०४१, २१३ हडपसर – तुषार राजेंद्र कांबळे – ९८९०५०९१५२, २१४ पुणे कॅन्टोन्मेंट – अमीर मुलाणी – ९६०४७०९९५४, २१५ कसबा पेठ – श्रीमती स्मिता सुश्रुत जोशी – ९८६०५७३०८५ यांचा समावेश असलेला मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे राखीव मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यामध्ये दिलीप आंब्रे – ८६९८८४८३२४ यांचा समावेश आहे.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ संदर्भात मतदारांनी अधिक माहितीसाठी किंवा अडचणींसाठी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मदत कक्षाशी अथवा १९५० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.



