
पुणे : फ्रेन्डशीप क्लबच्या नावाखाली हाय प्रोफाइल महिलांसोबत शरीरसंबंध ठेवण्याचं स्वप्न दाखवत एका महिलेनं कोथरूडमधील एका व्यावसायिकाला तब्बल 60 लाखांचा गंडा घातला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. ‘फ्रेन्डशीप क्लब’च्या नंबरवर फोन करणे चांगलेच महागात पडले आहे.

फिर्यादी व्यावसायिक (वय. 76) हे कोथरूड परिसरातील रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘मिनाक्षी फ्रेन्डशीप क्लब’ची जाहिरात पाहिली होती. ही जाहिरात पाहून त्यांनी दिलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधला आणि येथूनच हा फसवणुकीचा धक्कादायक प्रकार सुरू झाला.
वानवडी येथील रहिवासी असणाऱ्या महिलेनं फिर्यादी व्यावसायिकाला हाय प्रोफाइल महिलांसोबत शरीरसंबंध (lure of sex with high profile woman) ठेवता येतील. तसेच यातून तुम्हाला पैसेही मिळतील असं आमिष दाखवलं होतं. फिर्यादी व्यावसायिक देखील आरोपी महिलेच्या बतावणीला बळी पडले. त्यानंतर आरोपी महिलेनं (वय. 28) आपल्या एका पुरुष साथीदाराच्या मदतीने फिर्यादीकडून वेळोवेळी तब्बल 60 लाख 20 हजार रुपये उकळले आहेत.
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित व्यावसायिकानं पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. फिर्यादी व्यावसायिकाच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत वानवडी येथील एका महिलेसह तिच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला. या प्रकरणी पोलिसांनी 28 वर्षीय महिलेला वानवडी परिसरातून अटक (Accused woman arrested) केली आहे. तर तिच्या एका पुरुष साथीदाराचा शोध घेतला जात आहे. तिने अशा पद्धतीने आणखी कोणाला फसवलं आहे का? याचा तपास केला जात आहे.



