डिकाई आयोजित दिव्यांगांच्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

पुणे : दिव्यांग इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिकाई ) या दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेतर्फे नुकतीच आंतरशालेय चित्रकला स्पर्धा पार पडली.या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष. या स्पर्धेमध्ये एकूण १५०० पेक्षा अधिक दिव्यांग कलाकारांनी सहभाग घेतला होता. दिव्यांग मुलांच्या कलेला वाव देण्यासाठी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे या भव्य चित्रकला स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत दिव्यांग आणि इतर विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.वय वर्षे ४ ते ९वर्षे या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपला ऑनलाइन सहभाग नोंदवला.यानंतर प्रसिद्ध कलाशिक्षक जयंत टोले आणि त्यांच्या कलाशिक्षक टीमने यातून ३५० उत्कृष्ट चित्रांची निवड केली .यातून अंतिम ३० सर्वोत्तम चित्रांची निवड करण्यात आली.

स्पर्धेतून प्रत्येक गटातील सर्वोत्तम पाच बालचित्रकारांच्या चित्रांची निवड करण्यात आली. तिन्ही गटांतील पंधरा सर्वोत्कृष्ट बालचित्रकारांना रोख पंधराशे रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी डिकाईचे संस्थापक ध्यानमूर्ती रघुनाथ येमुल गुरुजी, सुप्रसिद्ध बीव्हीजी ग्रुपचे संचालक हनुमंत गायकवाड, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिलीप कोटीभास्कर, सक्षम पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष ॲड मुरलीधर कचरे ,प्रसिद्ध उद्योजक नितीन कुलकर्णी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या सभागृहात आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमास अनेक पालक,शिक्षक आवर्जून उपस्थित होते.
दिव्यांगजन(अपंग व्यक्ती) यांना. स्वयंरोजगार, कौशल्यविकास, यथायोग्य शिक्षण या माध्यमातून आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्थापन केलेल्या डिकाई या संस्थेचे संस्थापक ध्यानमूर्ती रघुनाथ येमुल गुरुजी म्हणाले की, दिव्यांगांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी सरकार ने एक विशेष दिव्यांग इंडस्ट्री सुरू करावी. उच्च दर्जाची , शास्त्रीय पद्धतीने तयार करता येणारी उत्पादने जसे की हर्बल फिनेल निर्मिती अथवा सोप्यापद्धतीने बनविण्यात येणाऱ्या गोष्टी शासनाने दिव्यांगांकडून खरेदी कराव्यात त्यासाठी त्यांना विशेष तज्ञांकडून प्रशिक्षण देऊन त्यांचे जगणे सुलभ करावे.सार्वजानिक आजच्या काळात पर्यावरण पूरक उत्पादनांचे महत्व लक्षात घेऊन सार्वजनिक स्वच्छतालये, हॉस्पिटल्स, शाळा,महाविद्यालये तसेच प्रत्येक घरात हे हर्बल फिनेल पोचणे आवश्यक आहे. यासाठी डिकाई संपूर्ण सहकार्य करेल. डिकाई ,सरकार व काही सामाजिक संस्था एकत्र येऊन दिव्यांग लोकांसाठी दिव्यांग कॉलनी स्थापन करावी ज्यामध्ये दिव्यांग लोकांना शिक्षण, रोजगार उद्योग ,हॉस्पिटल ,घर हे सगळे एकच ठिकाणी उपलब्ध होईल. तसेच दिव्यांग निर्मित ब्रँडेड उत्पादने मार्केट मधे उपलब्ध करून देणे याद्वारे दिव्यांगांना टाटा, अंबानी सारखे उद्योजक बनवायचे असेल तर शासनाबरोबर समाजातील चांगल्या लोकांनी एकत्र येत त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. येमुल गुरुजी यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेली ‘डिकाई ‘ ही संस्था असून, रघुनाथ गुरुजी या माध्यमातून दिव्यांग मुलांच्या शैक्षणिक, आत्मिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत आहेत. पारितोषिक वितरणाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.हनुमंतराव गायकवाड यांनी सांगितले की दिव्यांग जनांसाठी डिकाई आणि येमूल गुरुजी हे अत्यंत चांगल्या उद्देशाने काम करत आहेत.या कामासाठी बीव्हीजी ग्रुप सदैव डिकाई बरोबर असेल. स्पर्धे च्या संयोजनासाठी डिकाईचे सेक्रेटरी शेखर यादव आणि रमणबाग प्रशालेचे उपमुख्याध्यापक जयंत टोले यांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर कोष्टी यांनी केले संयोजन नाट्यकर्मी रवींद्र सातपुते व रमण बाग प्रशालेतील चित्रकला शिक्षिका अंजली मालुसरे यांनी केले.





