कोथरूड मध्ये ई व इतर टाकाऊ कचरा संकलन मोहीमेत एवढा टन कचरा झाला गोळा..

कोथरूड : “स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२४ व २०२५” च्या अनुषंगाने कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभाग व स्वच्छ सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक १०,११,१२ तीनही ठिकाणी एकूण २१ ई कचरा संकलन केंद्र उभा करून ई कचरा संकलन करण्यात आले.
या संकलन केंद्रावर स्वच्छ सहकारी संस्था व यांचे समन्वयक, वार्ड कोऑर्डिनेटर व पुणे महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक मोकादम व सेवक यांनी दररोज नागरिकांना माहिती पत्रक देऊन आपल्या घरातील ई कचरा व न लागणाऱ्या इतर वस्तू संकलन केंद्रावरती जमा करणे विषयी जनजागृती करण्यात आली होती. यामुळे सदर संकलन केंद्रावर आपल्या घरातील ई-कचरा व न लागणाऱ्या सर्व वस्तू नागरिकांनी स्वतःहून आणून जमा केल्या.

विशेषतः डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व केंद्रांवरील जुने कपडे ५२० किलो, जुनी पुस्तके ४४५ किलो, जुन्या चपला व बुटे ४८७ किलो, लॅपटॉप ९, संगणक १६, जुने टि. व्ही. ८, चार्जर व इतर वायर १७७ किलो, जुने फ्रिज ३, ओव्हन ६, कापडी पिशव्या, गाद्या, उशा ५७०, प्लॅस्टिक खुर्ची व इतर फर्निचर २४० किलो तसेच टायर ट्यूब व इतर जुनी भांडी असे सर्व एकूण तीन हजार किलो म्हणजे सुमारे तीन टन वजनाचा ई-कचरा जमा करण्यात आला.



सदर मोहिमेमध्ये १२८७ नागरिकांनी आपल्या कडील ई-कचरा व इतर वस्तू संकलन केंद्रावर आणून देऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सदर मोहिम घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, परिमंडल कार्यालय क्रं. २ चे उपायुक्त अविनाश सकपाळ, महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, गणेश साठे,गणेश चोंधे, प्रमोद चव्हाण, जया सांगडे, रूपाली शेडगे, संतोष ताटकर, लक्ष्मीकांत कुलकर्णी यांच्या निरीक्षणाखाली मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी, सेवक परेश कुचेकर, प्रविण कांबळे, कुणाल जाधव, शरद वावळकर, स्वच्छ सहकारी संस्थेचे सोहम खिल्लारे, करूणा सोनवणे व इतर सहभागी होऊन ई – कचरा संकलन मोहिम यशस्वी केली.


